बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! पाण्याच्या टंचाईमुळे महाराष्ट्रातील ‘या’ कुटुंबाने घरातच खोदली विहीर

वाशिम | वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नेहमीच पाण्याची चुनचून असते. याच वाशिम जिल्ह्यातील एका कुटुंबाने सध्या संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे. संपूर्ण गावाच्या पाण्याची समस्या दूर व्हावी म्हणून या कुटुंबाने अवघ्या 22 दिवसांमध्ये आपल्या राहत्या घरात तब्बल 20 फूट खोल विहिर खोदली आहे. एएनआयने याबद्दल वृत्त दिलं आहे.

वाशिम जिल्ह्यातील जामखेड या गावात रामदास पोकळे यांचं कुटुंब राहतं. पोकळे कुटुंबियांना लॉकडाऊनच्या काळात घराच्या बाहेर जाणं टाळायचं होतं. यासाठी कुटुंबातील सदस्यांनी मिळून घरातच विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. रामदास पोकळे यांनी पत्नी आणि आपल्या 12 वर्षीय मुलाला सोबत घेऊन विहीर खोदण्याचं काम सुरू केलं. या तिघांनी 22 दिवसांत 20 फूट खोल विहीर खोदली आहे.

ही विहीर आणखी खोल खोदण्याचा मानस असल्याचं रामदास पोकळे यांनी सांगितलं आहे. आत्ता विहिरीला लागलेलं पाणी केवळ त्यांच्या कुटुंबाला पुरेल एवढंच आहे. मात्र, संपूर्ण गावाला पुरेल, असं पाणी विहिरीला लागावं, असं त्यांना वाटतं. याबाबद्दल त्यांनी वृत्त माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

रामदास पोकळे म्हणाले की, गावात पाण्याची खूप टंचाई आहे. लॉकडाऊनमध्ये हाताला काही काम नसल्याने आम्ही घरात विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. 22 दिवस खोदकाम केल्यानंतर 20 फुटावर आम्हाला पाणी लागलं. पण इतक्या पाण्यात केवळ माझ्या कुटुंबाची पाण्याची गरज पूर्ण होईल. यामुळे आणखी 5 ते 10 फूट विहीर खोदण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. जेणेकरून परिसरातील इतरांनाही पाणी मिळेल.

थोडक्यात बातम्या – 

दिलासादायक! कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यु नाही

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा पूर्णपणे अनलॉक; चित्रपटगृह, मॉल्स यांसह सर्व आस्थापना होणार सुरू

चितळे बंधूंना 20 लाखांची खंडणी मागणाऱ्यांना क्राईम ब्रांचने अशा प्रकारे सापळा रचत केली अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचं केलं कौतुक, म्हणाले…

मोठा निर्णय! रुग्णसंख्या घटल्यानंतर ‘या’ राज्यानं लाॅकडाऊन हटवला

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More