बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! मृत्यूच्या 70 वर्षांनंतर देखील आजही अनेकांना जीवनदान देतेय महिला

नवी दिल्ली | कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे या आजारावर उपचार केले जातात. परंतु अद्याप देखील यावर अनेक शोध होणे बाकी आहेत. हे शोध लावण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. असेच कर्करोगावरील उपचार शोधण्यासाठी 70 वर्षांपूर्वी गर्भाशयाचा कर्करोग झालेल्या एका महिलेच्या पेशीचा वापर करण्यात आला होता आणि आज या शोधामुळे लाखो लोकांचे जीव वाचत आहेत.

हेनरीटा लॅक्स या महिलेला गर्भाशयाचा कर्करोग झाला होता. हेनरीटाचा ऑक्टोबर 1951 मध्ये याच आजारामुळे मृत्यू झाला होता. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी अनेक प्रयत्न केले. परंतु तरी देखील तिचा जीव वाचू शकला नव्हता. यावेळी तिचं वय अवघं 31 वर्ष होतं. उपचारादरम्यान डॉक्टरांनी गुप्तपणे हेनरीटाची एक पेशी काढून घेतली होती.

पुढे हेनरीटाच्या या पेशीचा अभ्यास करुन विविध रोगांवर औषधे बनवण्यात आली. आज ही औषधे अनेक लोकांचे प्राण वाचवत आहेत.  हेनरीटाच्या किंवा तिच्या कुटुंबियांच्या परवानगीशिवाय काढलेली ही एक पेशी आज लाखोंच्या जीवनदानाच कारण ठरत आहे.

यामुळेच WHO चे चीफ Dr. Tedros Adhanom Ghebreyesus यांनी हेनरीटा हिला तिच्या मृत्यूनंतर 70 वर्षांनी पुरस्काराने सन्मानित केलं आहे. हा पुरस्कार हेनरीटाच्या वतीने तिचा 87 वर्षांचा मुलगा लॉरेन्स लॅक्सने स्विकारला आहे.

थोडक्यात बातम्या –

भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तर काय होणार? वाचा काय सांगतो ICCचा नियम

उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीने हाहाकार! तब्बल 46 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

सुट्टी नाहीच! ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला

“अजितदादांनी सांगितल्यामुळे शांत बसलो नाहीतर सोमय्यांचा तोतरेपणा काढला असता”

नरेंद्र मोंदीची का होतेय जेम्स बाँडसोबत तुलना?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More