बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चालतं-फिरतं जिवंत मॅगनेट; व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

तेहरान | आपल्या सगळ्यांना लोहचुंबक हे माहित असेलच. असा एकपण व्यक्ती नसेल त्याला लोहचुंबक म्हणजेच मॅगनेट माहित नसेल. बरेच जण लहानपणी त्याच्याबरोबर खेळलेही असतील. तसेच लोखंडाची कोणतीही वस्तू चुंबकाच्या संपर्कात आली की, त्याला जाऊन चिकटते. लोहचुंबकाचा हा महत्वाचा गुणधर्म आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल. परंतू तुम्ही कधी चालतं- फिरतं लोहचुंबक पाहिलं आहे का?.नसेल पाहिलं तर, सध्या सोशल मीडियावर याच संबंधी एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये चक्क एका व्यक्तीच्या शरिराला सर्व प्रकारच्या वस्तू चिटकत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये सुरूवातीला एक व्यक्ती आपल्या शरिराच्या पुढच्या भागावर गाडीचा मोठा पत्रा लावतो. तर तो पत्रा खाली न पडता त्या व्यक्तीच्या शरिरालाच चिटकून राहिला असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

त्यानंतर एक महिला त्या व्यक्तिच्या छातीवर आणि संपूर्ण गळ्याभोवती एक-एक करत 10 ते 12 चमचे लावते. ते ही चमचे त्या भागावर चिटकून राहतात. त्यानंतर ती महिला त्याच्या शरिरावर एक मिरची, काकडी तसेच टिव्हीचा रिमोट, सेल, डिश यासगळ्या वस्तू शरिरावर ठेवते.

दरम्यान, आश्चर्याची बाब म्हणजे त्या सर्व गोष्टी त्या व्यक्तिच्या शरिरावर चिटकून राहतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्यव्यक्त केलं आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“टॅापर्स नेहमीच अव्वल राहतात”; मोदींच्या प्रश्नाला विद्यार्थ्यांचं भन्नाट उत्तर

सरकारवर टीका केली म्हणून राजद्रोहाचा खटला भरता येणार नाही; विनोद दुआंवरील गुन्हा रद्दबातल

प्रियकराचं लग्न ठरलं, ढोल-ताशा घेऊन दारात आलेल्या प्रेयसीनं केला भलताच ड्रामा

75 वर्षीय सासऱ्याला कोरोनाची लागण, सुनेनं पाठीवर उचलून दवाखान्यात नेलं!

सेक्स रॅकेट प्रकरणात 2 अभिनेत्रींना अटक झाल्यानं बॅालिवूड हादरलं, वाचा संपूर्ण कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More