बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता!!! आता पुरुष देखील प्रेग्नेंट होणार?; वैज्ञानिकांचा अजब प्रयोग यशस्वी

नवी दिल्ली | अलिकडच्या काही वर्षांमध्ये विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. जगभरातील अनेक वैज्ञानिक वेगवेगळ्या गोष्टींवर सतत प्रयोग करुन नवनवीन शोध लावत असतात. सध्या असाच काहीसा अजब शोध चीनमधील वैज्ञानिकांनी लावला आहे. एका रिसर्चनंतर चीनच्या वैज्ञानिकांनी पुरुष देखील प्रेग्नेंट होऊ शकतात, असा दावा केला आहे.

चीनच्या काही वैज्ञानिकांनी नर उंदरामध्ये गर्भधारणेची पिशवी बसवून काही पिलांना जन्म दिला आहे. नर प्राण्याला प्रेग्नेंट करण्याचा अजब गजब प्रयोग जगभरात प्रथमच झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून चीन मधील शास्त्रज्ञ यावर रिसर्च करत असल्याचं चीनमधील वैज्ञानिकांनी सांगितलं आहे.

हा प्रयोग चीन मधील शांघायच्या नेवल मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये करण्यात आला आहे. वैज्ञानिकांनी प्रथम मादी उंदराच्या बॉडीमधून गर्भधारणेची पिशवी काढली. यानंतर ती पिशवी नर उंदरामध्ये बसवण्यात आली. पुढे प्रेग्नेंट नराचं सिजेरियन करून त्याच्या पिलांना जन्माला घालण्यात आलं. हा प्रयोग चार टप्प्यांमध्ये करण्यात आला आहे.

वैज्ञानिकांच्या मते ज्या तृतीयपंथींन्ना मुलांना जन्माला घालायचं आहे, त्यांना याची मदत होणार आहे. सध्या याचा सक्सेस रेट 3.68 टक्के आहे. आता पुढील टप्प्यात चीनचे वैज्ञानिक या रॅट मॉडेलचा वापर मानवांवर करण्याचा विचार करत आहेत. यापूर्वी NYU स्कूल ऑफ मेडिसीनने असाच एक प्रयोग केला होता. मात्र, तो अयशस्वी ठरला होता.

थोडक्यात बातम्या – 

नाशिक दुर्घटनेत मुलाच्या मृत्यूनंतर सरकारने दिलेले 10 लाख रुपये घेऊन सून फरार

“बारामतीकरांनो, पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा”

मिल्खा सिंग यांची भूमिका साकारणारा अभिनेता फरहान अख्तर म्हणाला….

देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 60 हजारात, मृतांचा आकडाही घटला

पप्पा म्हणाले “केसांचा कोंबडा छान दिसतोय”, पाहा प्राजक्ता माळीची वेगळीच हेअरस्टाईल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More