बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! आता केवळ आवाजाने चार्ज होणार MIचा स्मार्टफोन

नवी दिल्ली | Xiaome कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांची गरज लक्षात घेऊन स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे फिचर्स आणत असते. यामुुळे ग्राहक देखील Xiaome च्या स्मार्टफोन्सला पसंती दर्शवतात. अशातच आता या लोकप्रिय कंपनीने आणखी एक कारनामा केला आहे.  फक्त आवाजाने स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्स चार्ज होऊ शकतील, अशी टेक्नॉलॉजी कंपनीने शोधली आहे.

Xiaome कंपनीने या टेक्नॉलॉजीसाठी China National Intellectual Property Administration कडे पेटंट फाईल केलं आहे. ही टेक्नॉलॉजी आवाजातील कंपने alternative current मध्ये रूपांतरित करते. त्यानंतर alternative current डीसी पॉवरमध्ये रूपांतरित होऊन स्मार्टफोन चार्ज होतो. या टेक्नॉलॉजीमध्ये ऊर्जा साठवून ठेवण्याच्या मॅकॅनिजमचा वापर करण्यात आला आहे.

Xiaome कंपनीने यापुर्वी देखील अशीच एक टेक्नॉलॉजी शोधून काढली होती. Mi Air Charge असं या टेक्नॉलॉजीचं नाव होतं. Mi Air Charge टेक्नोलॉजीद्वारे स्मार्टफोनला मिलीमीटर लहरी पोहोचतात आणि या लहरी इलेक्ट्रिक पॉवरमध्ये रूपांतरित होऊन फोन चार्ज करतात.

दरम्यान, Xiaome कंपनीने सध्या सादर केलेली टेक्नॉलॉजी व्यवसायिकरित्या जगासमोर आलेली नाही. कंपनीने हे पेटंट फाईल केल्यापासून अनेक लोक फक्त आवाजाने चार्ज होणाऱ्या स्मार्टफोन्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. या हटके चार्ज सिस्टीमचे  मोबाईल्स बाजारात केव्हा येणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा?; काँग्रेसचा थेट सवाल

देशातील नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा घटला, वाचा आजची आकडेवारी

“केंद्र सरकार जून-जुलै महिन्यांपासून देशातील लसीकरणाचा वेग वाढवणार”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर; तब्बल 123 रुग्णांचा मृत्यू

‘या’ ठिकाणी देशभक्तीपर गीतांच्या तालावर 100 लोकांनी सलग दोन तास केली योगासने

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More