बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोकप्रिय आमदार निलेश लंके लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर!

अहमदनगर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी कोरोनाकाळात केलेल्या दमदार कामगिरीमुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. साधी राहणी आणि उच्च विचार असणाऱ्या निलेश लंके यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निघावा, अशी मागणी अनेकांनी केली होती. याच आग्रहास्तव आता लंकेवर एक चित्रपट तयार करण्यात येणार आहे.

24 ऑक्टोबर रोजी पिंपळनेर येथे या चित्रपटाची घोषणा करण्यात येणार आहे. लेखक, दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे हे लंके यांच्या जीवनावर चित्रपट बनविणार आहेत. यामुळे आता लवकरच निलेश लंके यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, निलेश लंके पारनेर तालुक्यातील हंगा या गावात जन्मले आहेत. त्यांचे वडील पेशाने शिक्षक होते. शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून लंके यांचा राजकीय प्रवास चालू झाला.

निलेश लंके यांच्या घरची परिस्थिती अगदी हालाखीची होती. तरीही आपल्या परिस्थितीवर मात करत त्यांनी राजकीय वाटचाल चालूच ठेवली. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊन आमदारकी मिळवली. लंके यांचा हाच प्रवास आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

थोडक्यात बातम्या –

‘ब्लू फिल्म्स पाहणाऱ्या RSS कडून शिकण्यासारखं काहीच नाही’; ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

भाजपने राज ठाकरेंच्या नादाला लागून मनसेशी युती करु नये – रामदास आठवले

देशातील नव्या कोरोना रूग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ, पाहा ताजी आकडेवारी

आधी कुत्रा माणसाला चावला मग माणूस कुत्र्याला चावला अन् नंतर…

राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू, मात्र पुणे जिल्ह्यांबाबत अजून शंकाच

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More