काय सांगता! फ्लर्टिंग डे देखील असतो; असा करा सेलिब्रेट

नवी दिल्ली | प्रेम (Love) म्हणेज एक नशा आहे. नुकताच व्हॅलेंटाईन वीक (Valentine week) सेलिब्रेट झाला. अनेकांनी आपलं प्रेम व्यक्त केलं काहींना यश मिळालं तर काहींना अपयश आलं. काहींनी व्हॅलेंटाईनचा मुहूर्त साधून लग्नदेखील केलं. आता अॅन्टी व्हॅलेंटाईन वीक सुरु झाला आहे. 21 तारखेपर्यंत हा वीक साजरा केला जाणार आहे.

अॅन्टी व्हॅलेंटाईन वीक (Anti Valentine Week) म्हणजे अगदी व्हॅलेंटाईन वीकच्या विरुद्ध यात स्लॅप डे, कीक डे असंदेखील डे साजरे होतात. त्यातला त्यात सिंगल लोकांसाठी एक महत्त्वाचा दिवस असतो. तो दिवस आहे फ्लर्टिंग डे. प्रेमाच्या पूर्वीची पायरी म्हणजे फ्लर्टिंग होय. त्यासाठीच हा दिवस साजरा केला जातो.

आज फ्लर्टिंग डे (Flirting Day) आहे. त्यामुळे तुम्ही काही टिप्स वापरुन हा दिवस चांगला साजरा करु शकता. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबतदेखील हा दिवस छान व्यतीत करु शकता. असं म्हणतात की प्रेम जिंवत ठेवण्यासाठी फ्लर्टिंग डे साजरा केला जातो. फ्लर्टिंग मुळं प्रेमात रोमान्स कायम राहतो.

स्पर्शाची भाषा (The language of touch) प्रेमात खूप काही सांगून जातं. तुम्ही न सांगता एकमेकांना अलगदपणे स्पर्श करा. तुमच्या पार्टनरच्या कपाळावर,मानेवर किस (Kiss) करा. अलगदपणे न सांगता त्याचा किंवा तिचा हात हातात घ्या. हा देखील फ्लर्टिंगचा एक प्रकार आहे, याप्रकारे तुम्ही तुमच्या प्रेमाची जाणीव करुन देऊ शकता.

छान असा ड्रेस अप (dress up) करुन तुम्ही तुमच्या पार्टनरला आश्चर्यचकित करु शकता. तुमचा नवा स्टायलिश लूक पाहून तुमचा जोडीदार नव्यानं तुमच्या प्रेमात पडेल. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक (Romantic) पद्धतीनं बोला. तुम्ही त्याच्यासाठी महत्त्वाचे आहात हे सांगा. जोडीदारासोबत बसा गप्पा मारा. या पद्धतीनं तुम्ही आजचा दिवस छान साजरा करु शकता.

महत्त्वाच्या बातम्या