बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! IPLमध्ये ‘या’ 3 भारतीयांनी अजून एकही चौका मारला नाही!

मुंबई | इंडियन प्रिमियर लीग आल्यानंतर क्रिकेटमध्ये खूप काही बदला झाले आहेत. कोणत्याही खेळाडूला आपल्या संघात जागा मिळवायची असेल तर तो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन आपल्या संघात जागा मिळवू शकतो. हे फक्त भारतीय खेळाडू नाही तर बाकी देशाचे खेळाडू देखील, असं करु शकतात. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक चाहत्याला वाटतं की, प्रत्येक खेळाडूची खेळी चांगली झाली पाहीजे. मात्र, त्यातील फक्त काहीचं खेळाडू चौका आणि षटकार मारू शकतात.

टी-20 क्रिकेट फाॅरमॅटला फास्ट क्रिकेट देखील म्हटलं जातं. टी-20 फाॅरमॅटमध्ये जास्तीत जास्त धावा करणारे सामने बघायला मिळतात. मात्र, IPLमध्ये ‘या’ 3 भारतीयांनी अजून एकही चौका मारला नाहीये. त्यात स्पिनर युजवेंद्र चहल, प्रज्ञान ओझा आणि वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल या 3 तीन भारतीय गोलंदाजांचा समावेश आहे.

आयपीएल मध्ये सर्वात जास्त रन करणारा खेळाडू म्हणजे विराट कोहली आहे, तर सर्वात जास्त चौके गब्बर शिखर धवनने मारले आहेत. सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम क्रिस गेलच्या नावावर आहे. मूळात असे खुप खेळाडू आहेत ज्यांनी त्यांच्या आयपीएल करिअर मध्ये एकही चौका मारला नाहीये.

दरम्यान, आयपीएलच्या 14 व्या हंगामातील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात होणार आहे. चेन्नईच्या चेपाॅक मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. पण त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा फटका बसला आहे. बंगळुरूचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता कर्णधार विराट कोहली याच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या – 

फखर जमान रनआऊट प्रकरण, ‘या’ कारणामुळे क्विंटन डी कॅाकला क्लीनचीट!

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास आता पुण्यातील ‘या’ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार नाहीत!

“येत्या 40 दिवसात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडावं लागेल”

करिनाच्या धाकट्या लेकाचा फोटो चुकून झाला व्हायरल; असा दिसतो तैमुरचा लहान भाऊ

आयपीएलवर कोरोनाचं सावट; आणखी 14 कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More