बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बारावीच्या परीक्षा घेऊन तुम्हाला काय वेगळं सिद्ध करायचंय?; सर्वोच्च न्यायालयाने खडसावलं

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांमध्ये दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. नुकत्याच बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आंध्रप्रदेशने मात्र यावर वेगळी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

आंध्र प्रदेश सरकारने जुलै महिन्यात बारावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान, इतर राज्यांच्या परीक्षा रद्द झाल्या असताना आंध्र प्रदेशला वेगळं काय सिद्ध करायचं आहे?, असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी दरम्यान म्हटलं आहे की, ‘सरकारने फाईल नोटिंग करावं तसेच हा निर्णय कोणी घेतला? हा निर्णय घेण्यापूर्वी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता का? शिवाय जर, परीक्षेदरम्यान एकाही विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर, न्यायालय 1 कोटी रुपये नुकसान भरपाईचा आदेश सरकारला देऊ शकते’, असं म्हणत आंध्रप्रदेश सरकारला चांगलंच खडसावलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान सरकारला चांगलंच खडसावलं तसेच सर्व गोष्टींचा विचार करून उद्या न्यायालयात आपलं मत स्पष्ट करा, असं आंध्रप्रदेश सरकारला सांगितलं आहे. त्यामुळे आता आंध्र प्रदेश सरकार यावर नेमकं काय स्पष्टीकरण देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही”

“ओबीसी नेत्यांचं नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता?”

डेल्टा प्लस व्हेरिएंटनं टेंशन वाढवलं; राज्यातील निर्बंध पुन्हा कडक होण्याची शक्यता

‘विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देणं हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट’; भाजप नेत्यांसोबत मनसे आमदार मैदानात

बैठक भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची, चर्चा मात्र अजित पवारांची!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More