बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ लेडी डॉनचा तुमच्याशी संबंध काय?, नवाब मलिकांनी पुन्हा समीर वानखेडेंना घेरलं

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही त्यांनी आरोप करत कार्डेलिया क्रूज प्रकरणात सुरू असलेली कारवाई ही बनावट असल्याचं म्हटलं.

त्यानंतर आज नवाब मलिक यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. लेडी डॉनच्या हस्तक्षेपावरून नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना चांगलंच फटकारलं. फ्लेक्चर पटेल याच्यासोबत फोटोमध्ये असलेली लेडी डॉन नेमकी कोण आहे?, तिचा तुमच्याशी संबंध काय? असे नानाविध प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केले आहेत.

लेडी डॉन ही बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करत आहे का? असं म्हणत ती वानखेडेंची नातेवाईक आहे, असा दावा करत फ्लेक्चर पटेल तिला लेडी डॉन म्हणत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच समीर वानखेडेंचा फॅमिली फ्रेंड असलेला पटेल हा पंच कसकाय असू शकतो?, असा प्रश्नही नवाब मलिक यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक हे वारंवार एनसीबीवर निशाणा साधत आरोप करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता यामध्ये रोज वेगवेगळे खुलासे होत असल्याने सर्वांचं लक्ष्य याकडे लागलं आहे. या प्रकरणात आता पुढे आणखी काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

गॅस कटरने एटीएम कापून चोरट्यांनी पळवळी लाखोंची रक्कम

“यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्थ मंत्रिमंडळ तुरुंगात असतं”

आता गॅस सिलेंडरच्या बुकिंगमध्ये वाचवा पैसे, कसं ते वाचा सविस्तर

“…पण जेव्हा सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही”

पुण्यात डिझेलची शंभरी पार तर दुसरीकडे पुणेकरांचा रिक्षाप्रवासही महागला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More