बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुजय विखेंनी त्या बॅाक्समधून नक्की काय आणलं?, रुपाली चाकणकरांना मोठी शंका

मुंबई | राज्याता कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात रेमडेसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली. याच पार्श्वभूूमीवर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी शनिवारी खास विमानाने नगरसाठी तब्बल दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शन आणले होते. यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी संशय व्यक्त केला आहे.

खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून 10 हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा असल्याचं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्स मध्ये काय होतं हं स्पष्ट करावं आणि जर रेमडिसिव्हीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, माझ्यापरीने जमेल ती मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा प्रयत्न मी करत आहे. तरुण मुलं आज तडफडत आहेत. त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नका. ज्यांनी मला खासदार केलं, निवडून दिलं, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने जमेल ती मदत करत आहे. हा पैसा कमावण्याचा धंदा नाही. लोकप्रतिनिधी म्हणून हे करणं आमची जबाबदारी आहे आणि त्याचं मला समाधान आहे. लोकांना माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही, असं डाॅ. सुजय विखे म्हणाले होते.

 

थोडक्यात बातम्या- 

राष्ट्रवादीचा आमदार अन् पुतण्यामधील प्रकरण, ‘या’ कारणामुळे कांड घडल्याची जोरदार चर्चा

ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या ‘या’ भाजप खासदाराच्या भावाचं कोरोनानं निधन!

#सकारात्मक_बातमी | वृद्धाश्रमातील वृद्धांची कमाल, 46 जणांनी कोरोनाला हरवलं!

पुण्यातील राष्ट्रवादीच्या आमदाराला हनिट्रॅप करण्याचा डाव, पुतण्याचंच नाव आल्यानं मोठी खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More