बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शहा आणि पवारांच्या ‘त्या’ बैठकीत नेमकं काय घडलं?, संजय राऊत म्हणाले…

मुंबई | सध्या चालू असणाऱ्या पावसाळी अधिवेशनामुळे सर्वच पक्षांचे खासदार दिल्लीमध्ये उपस्थित आहेत. यामुळे नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. मंगळवारी गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत सहकार क्षेत्राविषयी चर्चा झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. अशातच आता या बैठकीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केलं आहे.

अमित शहा हे सहकार खात्याचे मंत्री आहेत. यामुळे शरद पवार त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. या बैठकीत सहकार विषयावर चर्चा झाली असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. यानंतर राऊत यांनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं.

दरम्यान, अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत सहकार क्षेत्रासह साखर उद्योग आणि त्यावरील प्रश्नांबाबत चर्चा झाली असल्याचं पवारांनी सांगितलं आहे. नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरी लिमिटेडचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईककनवरे हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

मोदी सरकारने नव्याने सहकार खातं चालू केलं आहे. अमित शहा हे देशाचे पहिले आणि नवे सहकारमंत्री आहेत. शरद पवारांचा या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून दबदबा आहे. आता नवं खातं सुरू करण्यात आल्यानं या क्षेत्राशी निगडीत काही समस्या आणि विषयांवर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या –

“फटे लेकीन हटे नही, सोनियासेनेच्या प्रवक्त्यांना हतबलतेनं बीफचंही समर्थन करावं लागतंय”

“लग्नानंतरही त्याचे अनेक महिलांशी शारिरीक संबंध होते”

“पवार कुटुंब किती लबाड आहे हे राज्याला चांगलं माहित आहे”

सोनाली कुलकर्णीचा बोल्ड बिकीनी लुक पाहून सर्वच हैराण, सोनालीचे मालदीवमधले फोटो व्हायरल

धक्कादायक! पुरुषांपेक्षा जास्त ‘या’ स्त्रियांना पाॅर्न पाहण्यात अधिक रस, अभ्यासातून झाला ‘हा’ खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More