बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Dhananjay Munde: त्यादिवशी विधानसभेत नक्की काय झालं?; अखेर धनंजय मुंडेंनी खुलासा केला

मुंबई | काही दिवसांपुर्वी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते तथा सामाजित न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी हातवारे आणि इशारा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धनंजय मुंडे दंड थोपटताना देखील दिसत होते. त्यावरून धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

विधानभवनाच्या परिसरात विरोधी पक्षनेते पेनड्राईव्ह बॉम्ब फोडणार असल्याची माहिती मिळाली होती. मी त्यांना इशारे करून विचारलं असता त्यांनी माझ्याकडं बोट करून हो म्हटलं. तेव्हा वाटलं की, माझ्याबाबत पेनड्राईव्ह बॉम्ब फोडणार आहेत. त्यामुळे मी इशारे करत होतो, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलं आहे.

धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना राज्यात होत असलेल्या तपास यंत्रणांच्या कारवाईवरून टीका केली आहे. महाराष्ट्रामध्ये असलेल्या सरकारला अस्थिर करण्यासाठी सुडबुद्धीने महाविकास आघाडीमधील मंत्र्यांवर कारवाई केली जात आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जलसंपदा मंत्री जयंत पाटील विदर्भ महामंडळाचे चार वर्षांचे वित्तीय अहवाल मांडत असताना धनंजय मुंडे हातवारे करत होते. धनंजय मुंडे व्हिडीओ बॉम्ब कुठे आहेत हे खुणेने विचारताना दिसत होते. धनंजय मुंडे यांचा हा हावभाव करताना व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.

थोडक्यात बातम्या- 

“अजितदादा तुम्ही जिथं आहात, तिथं मी यायची गरज नाही, आपण एकत्रच…”

Weather Alert: राज्यातील ‘या’ भागात जोरदार पाऊस कोसळणार; उकाड्यापासून सुटका

Sharad Pawar: शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर नाव न घेता टीका, म्हणाले…

“महागाई कमी होण्यासाठी प्रार्थना करा”; गिरीश बापटांचा भाजपला घरचा आहेर

“6 खासदारांवर कुणीही पंतप्रधान होत नाही हे शरद पवारांना…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More