बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्या भेटीत नेमकं काय झालं?, वाचा सविस्तर

पुणे | अनेक वर्षानंतर सातारा आणि कोल्हापूरचे राजे मराठा आरक्षण निमित्त एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले या दोन्ही राजेंची पुण्यात भेट झाली. त्यांच्या भेटीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. पुण्यातील औंध परिसरात झालेल्या या भेटीमध्ये दोन्ही राजेंमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत असल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी भेटीनंतर दिली.

या भेटीनंतर उदयनराजे यांनी 16 तारखेला कोल्हापूरमधील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसंच, मराठा आरक्षण देणे ही ठाकरे सरकारची जबाबदारी आहे, जर त्यांनी निर्णय घेतला नाहीतर उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

संभाजीराजेंनी म्हटलं की, आम्ही पाच मागण्या केल्यात. त्या पूर्ण करणे राज्याच्या हातात आहेत. त्यातील पहिली मागणी सारथीची, दुसरी मागणी अण्णासाहेब पाटील महामंडळाची आहे. तिसरी मागणी, ओबीसींना ज्या सवलती मिळतात त्या मराठा समाजाला द्या, चौथी मागणी पंजाबराव देशमुख योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात एक वसतीगृह निर्माण करा, पाचवी महत्त्वाची मागणी जे 2 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी अडकले आहेत, त्यांना नोकरी द्या.

दरम्यान, सुप्रीम कोर्टानेही आदेश दिला आहे की, या मागण्या मंजूर करा आम्ही तुमचं स्वागत करु. पण आता आम्ही खूप बोललोय, आता लोकप्रतिनिधींनी बोलण्याची वेळ आली आहे. अधिवेशनाची आमची मागणी आहे. या माध्यमातून काही प्रश्न सुटु शकतात, असंही संभाजीराजेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

“लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना आडवा आणि गाडा”

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारकडून ‘ही’ मोठी तयारी सुरु!

‘भारतीय संघातील ‘हे’ 2 खेळाडू न्यूझीलंडवर पडतील भारी’- डेव्हिड वॉर्नर

“आमची महानगरपालिका निवडणूकीची सगळी तयारी झाली आहे, लवकरच दौरे सुरू होतील”

सुशांतच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंकिताने शेअर केला आठवणीतील ‘हा’ भावनिक व्हिडीओ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More