बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी बैठकीत नेमकं काय झालं?; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई | सोनिया गांधी यांनी भाजप विरोधी मुख्यमंत्र्यांची आणि देशातील काही वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुकांसाठी भाजप विरूद्ध रणनीती तयार करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हजेरी लावली होती. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील बैठकीत सामील झाले. या बैठकीत नेमकी काय चर्चा झालं यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे.

आपण आता सध्या एक आहोत. आता खुर्ची दिसत नाही. पण जेव्हा खुर्ची दिसेल तेव्हा ही आपण एकत्रच राहू. त्यासाठी आपण लोकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे असं बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे. सुमारे अडीच तास ही बैठक पार पडली, तर बैठकीत लोकशाही आणि महागाईच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं देखील राऊतांनी सांगितलं आहे.

जेव्हा बाबरी पडण्याचा प्रकार झाला तेव्हा पण सर्व जण पळून गेले होते. आम्ही तेच लोक आहोत. 1992 साली मुंबईत बाॅम्ब ब्लास्ट झाला त्या दंगलीत देखील शिवसेना पुढे आली होती. तेव्हा हे कुठे गेले होते? असा सवाल देखील संजय राऊतांनी भाजपला विचारला आहे. मुंबई दंगलीच्या वेळी हे लोकं घरात कडी लावून बसले होते आणि आज आम्हाला तालिबानी म्हणतात, अशी प्रत्यारोप देखील राऊतांनी केला आहे.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी काँग्रेससोबत युती नाही म्हणजे नाही म्हणारे उद्धव ठाकरे आता काँग्रेससोबत हातमिळवणी करण्यास तयार आहेत, अशी टीका आता उद्धव ठाकरे यांच्यावर केली जात आहे. तर भाजपने देखील उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात झालेल्या बैठकीवरून शिवसेनेवर घणाघाती टीका केली होती.

थोडक्यात बातम्या-

‘खाता का पिता वाल्या चाचांचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ

‘राज ठाकरेंच्या बोलण्यानं…’; जातीयवादाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

भारतीय सैन्याच्या गढवाल रेजिमेंटच्या कवायतीचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

स्वप्निल शिंदे प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करा, स्वप्निलच्या आईने फोडला टाहो

राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More