बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसुख हिरेनचं नक्की काय झालं? संपूर्ण घटनाक्रम; वाचा सविस्तर…

मुंबई | मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक सापडल्याचं प्रकरण आता नव्या वळणावर जाऊन पोहचलं आहे. स्फोटक असलेल्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडल्यानं मोठी खळबळ माजली आहे. स्वतःच्या दुकानातून हिरेन घरी परतण्यासाठी बाहेर पडला मात्र तो घरी पोहचलाच नाही. हिरेनच्या कुटूंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र हिरेनचा शोध सुरू असतानाच मुंब्रा खाडित त्याचा मृतदेह सापडल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

स्फोटक सापडलेली गाडी सॅम पीटर न्यूटन नामक व्यक्तीची असून हिरेनला गाडीचे नुतनीकरण करण्यासाठी देण्यात आली होती. पीटरनं पैसे दिले नाहीत म्हणून हिरेननं सदर गाडी स्वतःकडेच ठेऊन घेतल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. मात्र मनसूक हिरेनची पोलिसांनी चौकशी केली असता आपण गाडी विकत घेतल्याचं त्यानं सांगितलं होतं, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.

मनसुखनं आपल्याला पत्रकार आणि पोलिस त्रास देत असल्याची तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात त्यानं मुंबईच्या आयुक्तांनी पत्रही लिहीलं होतं. अशी माहिती पोलिस अधिकारी सचिन वझे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

दरम्यान गाडी चोरीची तक्रार दाखल करणाऱ्या मनसुख हिरेनला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या केसमधील महत्वाच्या साक्षिदाराचा मृतदेह मिळणं हे फारच संशयास्पद आहे, असं म्हणत फडणवीसांनी हा खटला एनआयएकडे त्वरित सोपविण्यात यावा, अशी मागणीही केली आहे.

थोडक्यात बातम्या-

बाबो! रिषभ पंतने जेम्स अँडरसनला मारलेला रिव्हर्स स्वीप पाहिलात का, पाहा व्हिडीओ

‘चोर ज्यांना घाबरतात त्यांना नरेंद्र मोदी म्हणतात’; कंगणाचं तापसी आणि अनुरागवर टीकास्त्र

“मी फोटो पाहिलेत, हात बांधून कोणी आत्महत्या करत नाही”

आमदार अरुण लाड यांनी विधानपरिषदेत पदवीधारकांसाठी केली ‘ही’ मोठी मागणी

देवेंद्र फडणवीसांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचं म्हणणाऱ्याला अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More