संजय राऊतांची चौकशी सुरू असलेलं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय, वाचा सविस्तर
मुंबई | शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांची ईडी कडून सकाळपासूनच चौकशी सुरू आहे. तब्बल 8 तास उलटले असले तरी राऊतांची चौकशी अद्यापही सुरू आहे. तर ईडीला आपण संपूर्णपणे सहकार्य करू,असं राऊतांनी माध्यामांशी बोलताना सांगितलं होतं. मात्र, राऊतांची चौकशी सुरू असलेलं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय आहे?
गोरेगाव येथील सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीवरील गाळेधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. गुरूआशिष कन्स्ट्रक्शन प्रा.लि यांनी 40 एकर जमिनीवर पुनर्विकासासाठीचा प्रस्ताव म्हाडाला सादर केला. या प्रस्तावात 13 एकरपैकी साडेचार एकरवर मूळ रहिवाशांना घरं दिली जातील तर उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री करेल, हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, गुरूआशिष बिल्डरने आणि अधिकाऱ्यांनी या जागा परस्पर खासगी बिल्डरला विकल्या व प्रकल्प रखडला. तसेच तब्बल 1 हजार 34 कोटींची फसवणूक करण्यात आली.
यासंबधी गुरूआशिष कन्स्ट्रक्शनचे माजी संचालक प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली. सध्या ही कंपनी HDIL ने टेकओव्हर केली आहे. चौकशी दरम्यान प्रवीण राऊत यांच्या पत्नी स्वप्ना राऊत यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात 2010 साली 55 लाख रुपये ट्रान्स्फर झाल्याचं ईडीने म्हटलं आहे. ईडीने समन्स पाठवल्यावर ते 50 लाख परत करण्यात आले. त्यासंबधीच संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, प्रवीण राऊत, सारंग वाधवान आणि राकेश वाधवान हे गुरूआशिष कंपनीचे संचालक असताना या प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. म्हाडाची दिशाभूल करून यांनी 9 त्रयस्त बिल्डरांना FSI विकून 901 कोटी रूपये कमावले आहेत. रहिवाशांची घर देखील बांधली नाहीत, असं ईडीचं म्हणणं आहे.
थोडक्यात बातम्या
“कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी हे सरकार सज्ज”
राज ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव, पत्र लिहित म्हणाले…
‘…तर महाविकास आघाडी स्थापन करण्याची गरज नसती पडली’, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
नीरज चोप्राचा आणखी एक पराक्रम, रौप्य पदकावरही कोरलं नाव
मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंनी केला ‘हा’ नवा संकल्प
Comments are closed.