बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीत नेमकं शिजतयं तरी काय? ‘राष्ट्रमंच’च्या बैठकीआधी चर्चेला उधाण

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पाऊल ठेवल्यापासून दिल्लीतलं राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहेे. दिल्लीत पोहचल्या पोहचल्या त्यांनी प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती. 10 दिवसात त्यांनी प्रशांत किशोर यांची दुसऱ्यांदा भेट झाल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील दिल्लीत महत्वाची बैठक बोलावली आहे.

शरद पवार यांच्या भेटीनंतर प्रशांत किशोर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दिल्लीत नेमकं शिजतयं तरी काय?, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तिसऱ्या आघाडीचं मॉडेल वापरून झालं आहे. हे मॉडेल जुनं आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीला हे मॉडेल अनुकूल नाही. तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देईल, असं वाटत नाही, असं किशोर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसचाच चेहरा भाजपसमोर उभा केला जाईल की, अन्य पर्याय सुचवले जातील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आमच्या राष्ट्रमंचची शरद पवारांसोबत बैठक होणार आहे. दुपारी 4 वाजता ही बैठक होईल. पवारांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच निवासस्थानी ही बैठक होणार असून पवारांनीही त्याला सहमती दर्शवली आहे, असं ट्विट माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूलचे नेते यशवंत सिन्हा यांनी केलं आहे. मागील काही दिवसांपासून यशवंत सिन्हा केंद्र सरकार विरोधात आक्रमक भुमिका घेत आहेत.

दरम्यान, या बैठकीला ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ केटीएस तुलसी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरैशी, केसी सिंह, गीतकार जावेद अख्तर, प्रीतीश नंदी, ज्येष्ठ वकील कोलिन गोन्साल्वीस, करण थापर आणि आशुतोष या बैठकीत सामिल होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा”

कसोटी विश्वचषकाच्या फायनलवर पाणी; सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता

राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे का?; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

कोरोनानंतर आता ‘निपाह’चा धोका?; राज्यात प्रथमच वटवाघूळांमध्ये आढळला निपाह व्हायरस

गोवर लस कोरोनावर प्रभावी; पुण्यातील महाविद्यालयाचं मोठं संशोधन

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More