बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीत नेमकं शिजतंय काय?, चंद्रकांत पाटलांच्या पाठोपाठ फडणवीसही दिल्लीत

मुंबई | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष तयारीला लागल्याचं दिसतंय. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात भेटीगाठी आणि बैठकांना उधाण आलं आहे. अशातच काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोत्यात देखील खळबळ उडाली आहे. अशातच आता भाजप नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या आहेत. (After Chandrakant Patil, Fadnavis left for Delhi)

काल चंद्रकांत पाटील दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी भाजपच्या इतर दिग्गज नेत्यांची देखील भेट घेतली आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाल्याचं दिसतंय. अशातच आता चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीला रवाना झाले आहेत.

दिल्लीत देवेंद्र फडणवीस आरएसएसच्या काही बैठकांमध्ये देखील उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे हा दौरा पुर्वनियोजीत नव्हता, असंही म्हटलं जात आहे. मात्र , चंद्रकांत पाटील देखील दिल्ली दौऱ्यावर असल्याने भाजप कार्यालयात मोठी मिटींग देखील होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ज्या भाजप नेत्यांना पक्षाने विधानसभेचं तिकीट नाकारलं होतं, त्या नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी आता आई होण्यासाठी जास्त वाट पाहू शकत नाही”

“तुला मराठी ठाऊक नाही का? हा महाराष्ट्र आहे…”, राज्यपाल कोश्यारी संतापले

चिंता वाढली! देशातील 13 राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकणार

“2024 ला महाविकास आघाडीचंच माॅडेल, तिन्ही पक्ष एकत्र लढले तर…”

राज कुंद्राला मोठा झटका; अश्लील व्हिडीओ प्रकरणी पुन्हा अडचणीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More