मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशासाह राज्यभरात लॉकडाउन आहे. मात्र लॉकडाउन असतानाही नियम धाब्यावर बसवून गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता या आयपीएस अधिकाऱ्याने एक विशेष पत्र उद्योगपती कपिल वाधवान यांच्या कुटुंबीयांना खंडाळाहून महाबळेश्वरला जाण्याच्या परवानगीसीठी दिलं. यावरून विरोधी पक्षाने सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले आहेत. दरम्यान गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.
महाराष्ट्रात नक्की चाललंय काय?, कोरोना रुग्णांच्या संख्येत देशात अव्वलआणि गृहखाते कोट्यावधींच्या घोटाळ्यात आरोपी वाधवान कुटुंबाला लॉकडाऊनचे नियम बाजूला ठेवत महाबळेश्वरला सुट्टीसाठी जाण्याकरिता रितसर पत्रक काढून विशेष सवलत देतं. गृहमंत्र्यांनी जबाबदारी घेत त्वरित राजीनामा द्यावा, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. यासंदरभात त्यांनी ट्विट केलं आहे.
मी यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. गुप्ता यांची याप्रकरणी कसून चौकशी केली जाईल. तसंच जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, खुद्द गृह मंत्रालयाच्या विशेष प्रधान सचिवांचं पत्र असल्याने पोलिस त्या पत्रापुढे काही करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या कुटुंबियांना प्रवास करू दिला. मात्र एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनीधीच्या ही बाब लक्षात आल्याने अधिकाऱ्याची चूक उजेडात आली.
महाराष्ट्रात नक्की चाललंय काय?#कोरोना रुग्णांच्या संख्येत देशात अव्वल
आणि गृहखाते कोट्यावधींच्या घोटाळ्यात आरोपी वाधवान कुटुंबाला लॉकडाऊनचे नियम बाजूला ठेवत महाबळेश्वरला सुट्टीसाठी जाण्याकरिता रितसर पत्रक काढून विशेष सवलत देते
गृहमंत्र्यांनी जबाबदारी घेत त्वरित राजीनामा द्यावा pic.twitter.com/BVuTWyAUQw— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 9, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
वाधवान कुटुंबाला फिरण्यासाठी विशेष पत्र देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर गृहमंत्र्यांनी केली कारवाई!
महत्वाच्या बातम्या-
मुंबईत लॉकडाउन कठोर होणार, SRPF आणि ड्रोनचीही मदत घेणार- राजेश टोपे
पिंपरीत कोरोना रुग्णात सारीची लक्षणं आढळल्याने खळबळ!
Comments are closed.