बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेची नेमकी भूमिका काय? तिसऱ्या आघाडीबाबत स्पष्टच सांगितलं…

मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी नुकतीच शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली होती. त्यानंतर ममतांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची देखील भेट घेतली. त्यावेळी ममतांनी देशात तिसऱ्या आघाडीचे (Third Alliance) संकेत दिले होते. त्यावर आता शिवसेनेने (Shivsena) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

देशात काँग्रसच्या नेतृत्वाखाली यूपीए (UPA) आहेच कुठे? असा खोचक सवाल ममता बॅनर्जींना विचारला होता. यूपीए नाही तसा एनडीएही नाही. मोदींच्या पक्षाला एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे, यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपाचे हात बळकट करण्यासारखेच असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे.

दैवी अधिकार कोणाला प्राप्त होत नाही. युपीए नेतृत्वाचा अधिकार कोणाला मिळणार हा येणारा काळच ठरवेल. आधी पर्याय तर उभा करा, अशा शब्दात शिवसेनेने ममता बॅनर्जी आणि विरोधकांना सुनावलं आहे. उताराला लागलेली ही गाडी पुन्हा वर चढूच द्यायची नाही आणि काँग्रेसची जागा आपण घ्यायची हे मनसुबे घातक असल्याचं देखील शिवसेनेने म्हटलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची राजकीय कुचाळकी सुरू आहे. ते सध्या कुचाळक्यांना तोंड देत सामना करत आहेत, असंही या अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे. दरम्यान, शिवसेनेने राष्ट्रवादीच्या विरोधी भूमिका घेऊन काँग्रेसला समर्थन दाखवल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; आता मुख्य परीक्षा ‘या’ तारखेला होणार

बुस्टर डोसची गरज आहे का?, असेल तर कोणती लस घ्यावी?; तज्ज्ञ म्हणतात…

रोहित पवारांना मंत्रिपद मिळणार का?, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“लड़ोगे नहीं तो जीताेगे कैसे?”, प्रियंका गांधींचा पारा चढला

‘मिस यु आई’ म्हणत एअरपोर्टवर गेला अन् आईनी चपलेने धुतलं; पाहा मजेशीर व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More