उद्धव ठाकरेंच्या सभास्थानी शिवसैनिकांमध्ये का झाला राडा?

अहमदनगर | शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये राडा झाला. यामध्ये काही शिवसैनिकांची डोकी फुटली आहेत. शिवसेनेने या हल्ल्याचं वृत्त फेटाळलं असलं तरी या घटनेचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. 

कशामुळे झाला राडा?

आमदार विजय औटी यांनी पारनेरमध्ये मेळाव्याचं आयोजन केलं होतं. पारनेर तालुक्यात शिवसेना वाढवण्याचं काम तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी केल्याचं मानलं जातं. मात्र निलेश लंके यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आमदार औटी आणि लंके यांच्यात वैर निर्माण झालं. मेळावा संपल्यानंतर उद्धव ठाकरेंचा ताफा निघाला त्यापाठोपाठ औटी समर्थकांचा ताफा निघाला. यावेळी लंके समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. औटी समर्थकांनी त्यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रुपांतर दगडफेकीत झाल्याचं कळतंय.