बीडमध्ये एका महिन्यात घडल्या मोठ्या घडामोडी? जाणून घ्या संपूर्ण घटना एका क्लिकवर

Beed

Beed l बीड जिल्ह्यातील मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दररोज नवनवीन वळण मिळत आहे. अशातच आता या प्रकरणातील तपासाला वेग आला आहे. कारण या हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे.

सरपंच हत्या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलेला नाही. कारण सध्या वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. त्याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल नसल्याने कराडवर मोक्का लावण्यात आला नाही. तर आता आपण पाहुयात या हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये एका महिन्यात नेमकं काय काय घडलं?

Beed l एक महिन्यात नेमकं काय घडलं? :

6 डिसेंबर 2024
– सरपंच संतोष देशमुखांचा मस्साजोग पवनचक्कीवर वाद झाला.
9 डिसेंबर 2024
– सरपंच संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
– याप्रकरणी धनंजय देशमुखांनी केजमध्ये तक्रार दाखल केली.
– याप्रकरणी केज पोलिसात 6 जणांविरोधात गुन्हा करण्यात आला.
10 डिसेंबर 2024
-बीडमध्ये जणसामान्यांनी रास्तारोको केला.
-जयराम चाटे आणि महेश केदारला अटक करण्यात आली.
11 डिसेंबर 2024
– क्राईम ब्रांचकडून प्रतिक घुलेला अटक करण्यात आली.
– वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
13 डिसेंबर 2024
– बीड जिल्हा बंदची हाक
– देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला.
14 डिसेंबर 2024
– केज पोलीस निरीक्षक महाजन सक्तीच्या रजेवर गेले.
18 डिसेंबर 2024
– विष्णू चाटेला अटक करण्यात आली.
19 डिसेंबर 2024
– संतोष देशमुखांच्या शवविच्छेदनात मारहाण झाल्याचं स्पष्ट झालं.
21 डिसेंबर 2024
– पोलीस अधीक्षक अविनाश बारगळांची बदली करण्यात आली.
– नवनीत कॉवत नवे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले.
– शरद पवार,अजित दादांनी घेतली संतोष देशमुख कुटुंबियांची भेट
24 डिसेंबर 2024
– खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला.
31 डिसेंबर 2024
– वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आला.
3 जानेवारी 2025
– डॉ. संभाजी वायबसे, सिद्धार्थ सोनावणे यांना ताब्यात घेतलं.
4 जानेवारी 2025
– सुधीर सांगळे, सुदर्शन घुलेला पुण्यातून अटक करण्यात आली.
6 जानेवारी 2024
– शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
– धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीयांची राज्यपालांची घेतली भेट
7 जानेवारी 2025
-देशमुख कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
-आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.

– 11 जानेवारी 2025
– संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का

News Title : What happened in Beed in one month?

महत्त्वाच्या बातम्या-

वाल्मिक कराडवर MCOCA का लागला नाही?, मोठं कारण समोर

वाल्मिक कराड इतक्या दिवस जेलमध्ये राहणार, समोर आली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! सरपंच हत्ये प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का, मात्र वाल्मिक कराडवर…

तारक मेहताच्या सोढीची प्रकृती चिंताजनक, अन्नपाणीही सोडलं

जबरदस्ती घर नावावर केलं, रिव्हॉलव्हरचा धाक दाखवून…; वाल्मिक कराडच्या मुलावर गंभीर आरोप

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .