बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ बैठकीत नेमकं काय झालं? पवार म्हणाले…

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या बैठकीत नेमकं काय घडलं हे अद्याप गुलदस्त्यात होतं. मात्र, आता स्वत: शरद पवार यांनी या बैठकीविषयी खुलासा झाला आहे.

ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झाली होती. जवळपास तासभर ही बैठक चालू होती. या बैठकीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचं शरद पवारांनी आता म्हटलं आहे. शरद पवार यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील कृषी आणि तांत्रिक विद्यापीठाचं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.

पवार या बैठकीविषयी बोलताना म्हणाले की, वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नव्हती. सरकार अधिक गतिमान व्हावी यासाठी यावेळी चर्चा झाली आहे. तसेच विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी जो उमेद्वार काँग्रेस देईल त्याला तिन्ही पक्ष पाठिंबा देतील.

दरम्यान, यावेळी पवारांनी केंद्राच्या कृषी कायद्यावर देखील आपली भूमिका मांडली आहे. कृषी कायद्यात दुरुस्ती करणं गरजेचं आहे त्यासाठी दुरुस्ती विधेयक आणलं पाहिजे. ते अधिक चांगलं होईल. त्यासोबतच दोन दिवसाच्या अधिवेशनात कृषी कायदा येईल असं वाटत नाही आणि आला तरी सगळ्यांशी चर्चा करून येईल असं मला वाटत, असं देखील शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

मोठी बातमी! नाना पटोलेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खळबळजनक पत्र

“अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही”

‘चुकीला माफी नाही’ गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

“जाती फोडून झाल्या, आता गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू आहे!”

“इतिहासात पहिल्यांदाच राजभवनामधून भाजप कार्यालय सुरूये”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More