बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काल जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं”

मुंबई | दोन दिवसीय अधिवेशनात मोठ्या घडामोडी घडल्या. अधिवेशनाचा पहिला दिवस हा वादळी ठरला पहिल्या दिवशी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान पाहायला मिळालं. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून गेल्यामुळे भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

भाजपवर केलेल्या कारवाईमुळे त्यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली होती. त्यासोबतच भाजपने निलंबनाच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्व प्रकारावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काल जे काही घडलं हे कितीही कुणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं. ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. हल्ली जे काही चाललेलं आहे. ते बघितल्यांतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचावण्याकडे आपला कल आहे, की खालवण्याकडे आहे? असा प्रश्न पडतो. पण मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, काल जे काही दृश्य पाहायला मिळालं, खरोखर शरमेने मान खाली जावी असं ते दृश्य होतं आणि जबाबदार पक्षाकडून हे घडलं. हे आम्ही घडवलेलं नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“खोटं कसं बोलावं हे महाविकास आघाडी सरकारकडून शिकलं पाहिजे”

‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरील शिल्पा शेट्टीच्या नृत्याने चोरलं चाहत्यांचं मन

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर आलं आर्थिक संकट, उपचारालाही नाहीत पैसे

मुहुर्त ठरला! ‘या’ दिवशी राहुल वैद्य आणि गर्लफ्रेंण्ड दिशा अडकणार विवाहबंधनात

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाणार?

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More