बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंधन दरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

मुंबई | संपूर्ण देशभरात गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरवाढीने सर्वसामान्य माणूस चिंतेत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने आतापर्यंतच्या किंमतीतील सर्वोच्च उच्चांक गाठला आहे. सणासुदीच्या तोंडावर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत असल्याचं भयावह चित्र निर्माण झालं आहे.

आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातही इंधनाचे दर स्थिर आहेत, त्यात कोणताही बदल झालेला नाही.

इंधनाबरोबरच, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता भाज्यांचेही दर गडाडले आहेत. ऐन सणासुदीच्या काळातच एवढी महागाई वाढल्याने सामान्य नागरिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती रोज सकाळी 6 वाजता बदलत असतात. ऑक्टोबर महिन्यात 7 तारखेलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती महागल्या होत्या. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सतत होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्यांनी अक्षरश: डोक्याला हात लावला आहे.

थोडक्यात बातम्या – 

Omicronच्या पहिल्या लक्षणाचा प्रसार होण्यापहिलेच व्हा सावधान, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

कमी वयात कोट्याधीश बनलेली उद्योजिका पंखुरी श्रीवास्तव हिचं निधन

“15 लाखांच्या भ्रष्टाचाराला मी भ्रष्टाचार मानत नाही,” भाजप खासदाराच्या ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता दिल्लीत ‘यलो अलर्ट’ जारी

“नाचे आहेत, ते पैसे दिले की नाचतात”; नारायण राणेंचा खोचक टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More