बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंधन दरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

मुंबई | कोरोनानं जवळपास गेल्या दोन वर्षापासून थैमान घातलं आहे. या काळात सर्वसामान्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं. कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही या किंमती वाढतच चालल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दर स्थिर असल्याचं चित्र आहे. आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल झालेला नाही. देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) आजही स्थिर आहेत.

मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. तेल विपनन कंपन्यांनी जागतिक तेलाच्या किंमतीत अस्थिरतेचं विश्लेषन करण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किंमती बदलल्या नाहीत. तसेच ओएमसीने पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किंमतीत कपात करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लवकरंच देशांतर्गत इंधनांच्या किंमती खाली येवू शकतात

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटत असल्याने देशांतर्गत किमतीही घटण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमती वाढल्या असल्याचं पहायला मिळालं. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेले असून सामान्यांकडून यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

सतीश सावंत यांच्या पराभवानंतर नितेश राणेंची पहिली पोस्ट, म्हणाले…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपची सरशी, सतीश सावतं यांचा पराभव

‘ मला वाटतं लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू हा बोगसपणा’

“माणसाचं मन भरकटलं की अशी माणसं गांजा प्यायल्यासाारखी बोलतात”

पोस्टरबाजी: “नितेश राणे हरवला आहे, शोधून देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More