नवी दिल्ली | भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जारी केले आहेत. आजही देशातील इंधन दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज सलग 105 दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
देशात 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर असल्याचं पहायला मिळालं. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळं जगात महागाईनं डोकं वर काढलं आहे. अशातच केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी 9 मार्च रोजी मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, इंधन दर यूपीए सरकारनं नियंत्रणमुक्त केलं होतं आणि जेव्हा इंधन दर नियंत्रणमुक्त केलं जात, त्यावेळी त्यात मालवाहतूक शुल्क देखील जोडलं जातं.
दरम्यान, उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे दरात वाढ झाली नसल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन पाच दिवस उलटून गेल्यानंतरही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.
थोडक्यात बातम्या –
वारंवार तहान लागणंही शरिरासाठी ठरु शकतं घातक, वाचा काय आहे कारण
कोरोनाची चौथी लाट येणार?; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा, म्हणाले…
Holi 2022: होळीच्या दिवशी घरच्या घरी बनवा हर्बल रंग; जाणून घ्या पद्धत
पोलीस भरती पदासाठी तब्बल ‘इतक्या’ हजार जागा, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा
“रोहित माझा कॅप्टन नाही, विराट कोहलीला कॅप्टन बनवा”
Comments are closed.