बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज इंधनदरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरवाढीमुळे सर्वसामान्य माणूस मेताकुटीला आला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच इंधनाचे दर हे गगनाला भिडले आहेत. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीतून दिलासा देण्यासाठी नुकताच केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला.

आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. तर राजधानी दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर कमी आहेत. दिल्लीमध्ये 1 लीटर पेट्रोलचा भाव 95.41 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे.

पेट्रोल डिझेलच्या किंमती सातत्यानं वाढत आहेत. दिवाळीपूर्वी पेट्रोलने शंभरी पार केली होती. परंतु त्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने आतापर्यंतच्या किमतीतील सर्वोच्च उच्चांक गाठल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. या इंधन दरवाढीमुळे नागरिकही हैराण झाले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

Aryan Khan Case: आर्यन खान प्रकरणाचा तपास स्थगित; ‘हे’ कारण आलं समोर

‘नितेश राणेंनी माफी मागावी’; राणेंच्या ‘त्या’ ट्विटनं शिवसैनिक आक्रमक

Omicronबाबत केलेल्या अभ्यासातून ‘ही’ दिलासादायक माहिती समोर, तज्ज्ञ म्हणाले…

‘सात समंदर पार’ गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

एसटी संप: कर्मचारी आज कामावर रुजू न झाल्यास होणार ‘ही’ मोठी कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More