बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाला?; वाचा आजचे ताजे दर

नवी दिल्ली | कोरोना काळात महागाईचा भडका पहायला मिळाला. त्यामुळे नागरिकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही या किंमती वाढतच चालल्या आहेत.

आज इंधन दरात (Fuel price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागील जवळपास एक महिन्यापासून पेट्रोल-डिझेल दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.

आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल दर (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे. देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) आजही स्थिर आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटत असल्याने देशांतर्गत किमतीही घटण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमती वाढल्या असल्याचं पहायला मिळालं.

कोरोनाचं सावट अद्यापही कमी झालेलं नाही. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सरकार कार्यरत आहे. या कोरोना काळात नागरिकांना अनेक वाईट गोष्टींना तोंड द्यावं लागलं. यामध्ये महागाईनं तर लोकांना हैराणंच करुन सोडलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“मुख्यमंत्री अजूनही हॉलिडे मूडमध्ये तर गृहमंत्री विकेंड मूडमध्ये”

“नरेंद्र मोदींनी सभा घेऊ नये, त्यांनी इतरांना आदर्श घालून द्यावा”

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, ‘या’ उमेदवारांना जोरदार धक्का

‘या’ महिन्यात कोरोनाची लाट ओसरेल; टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती

कोरोनामुक्त झालेल्यांनो काळजी घ्या!; WHO ने दिली ‘ही’ चिंता वाढवणारी माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More