बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘रूपाली चाकणकरांनी महिलांसाठी केलं तरी काय?’; शालिनी ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई | राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद मागील दीड महिन्यापासून रिक्त होतं. पण अखेर बुधवारी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची वर्णी लागली असून त्यांच्या निवडीची अधिसूचना राज्य सरकारनं काढली आहे. रूपाली चाकणकर गुरूवारी आपल्या अध्यक्षपदाची सुत्र हाती घेणार आहेत. मनसेच्या शालिनी ठाकरेंनी रूपाली चाकणकरांच्या निवडीवरून त्यांच्यावर टीका केली आहे.

सरकार स्थापन होऊन 2 वर्षांनी अखेर महिला आयोगाचं अध्यक्षपद नेमण्याला वेळ मिळाला मुहूर्त मिळाली ही आनंदाची बातमी आहे. पण रूपाली चाकणकर यांचं मेळावे घेणंं आणि चित्रा वाघ यांना उत्तर देण्यापलीकडं रूपाली चाकणकरांनी महिलांसाठी काय केलं आहे? असा सवाल मनसेच्या शालिनी ठाकरेंनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.

भाजपच्या चित्रा वाघ यांनी देखील रूपाली चाकणकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 2 वर्ष भाजपनं दिलेल्या लढ्याला यश आलं आहे. राज्य सरकारला महिला आयोगाचं अध्यक्षपद नेमण्यास अखेर मुहूर्त मिळाला. अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची निवड झाली. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते, असं वाघ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 4 फेब्रुवारी 2020 रोजीला विजया रहाटकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहीलं होतं. आयोगाचं अध्यक्षपद हे राजकीय स्वरूपाचं नाही हे सिद्ध झालं आहे. माझ्या वैयक्तिक हेतूनं मी हे पद सोडत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

वाचा ट्विट – 

थोडक्यात बातम्या –

सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे सेकंड हॅंड कारला आले ‘अच्छे दिन’

शाहरूख खान लेकाच्या भेटीला तर ‘मन्नत’वर एनसीबीचा छापा

आई आणि DSP दोन्ही कर्तव्य पार पाडली, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्यूटीवर

पिंपरीमध्ये वाईन शाॅप मालक आणि ग्राहकात तुफान राडा, पाहा व्हिडीओ

टाटा मोटर्स लवकरच करणार सीएनजी कार लाँच; ‘ही’ असणार किंमत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More