मेलबर्न | अजिंक्य रहाणेने ऐतिहासिक बॉक्सिंग डे कसोटीत उत्कृष्ट फलंदाजी करत शतक ठोकलंय. मात्र अनेकांच्या मनात आता बॉक्सिंग डे म्हणजे काय असा प्रश्न निर्माण झालाय.
बॉक्सिंग डे याचा बॉक्सिंगशी काहीही संबंध नाहीये. मुळात अनेक ठिकाणी ख्रिसमसचा म्हणजेच 25 डिसेंबरच्या पुढचा दिवस बॉक्सिंग डे म्हणून मानला जातो. क्रिकेट क्षेत्रात ऑस्ट्रेलिया दरवर्षी या दिवशी कसोटी सामन्याला सुरूवात करते आणि याला ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ असं म्हणतात.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ नेहमी 26 डिसेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर कसोटी सामने खेळतो. आणि हा सामना बॉक्सिंग डे टेस्ट म्हणून ओळखला जातो.
दरम्यान बॉक्सिंग डे हा दिवस स्टीफन डे म्हणून देखील ओळखला जातो. कॅटलोनिया, आयर्लंड आणि स्पेन या ठिकाणी हा दिवस हा सेंट स्टीफन डे म्हणून साजर करण्यात येतो.
थोडक्यात बातम्या-
अजिंक्य रहाणेच्या झुंजार फलंदाजीसमोर कांगारू बेजार; पहिल्या डावात भारताकडे आघाडी
“भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवार यांना संधी द्या”
नव्या वर्षात देशासाठी ‘हा’ संकल्प करा- नरेंद्र मोदी
एसटीचा प्रवास आता होणार अधिक वेगवान; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
“चंद्रकांतदादांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणजे देवेंद्र फडणवीसच”