Top News पुणे महाराष्ट्र

पुणे तिथे काय उणे! चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात ‘हे’ घडलं-शिवसेना

पुणे | 9 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पुण्याच्या कोथरुड उपनगरातील माहात्मा सोसायटीत रानगवा आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांच्या गोंधळामुळे गवा बिथरला आणि त्याचा मृत्यू झाला असं वनविभाने सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवरुनच पुणेकरांनीच गव्याला मारले असल्याचा आरोप शिवसेनेच्या सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

एका गव्यास पुणेकरांनी मारून दाखवले. पुणेकरांनी हेसुद्धा करून दाखवलं. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात हे घडले, असं शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे.

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारुन कोणी काढला काय? पुणे तिथे काय उणे!,असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपाला टोला लगावला आहे.

तसेच भाजपवाले आता असा आरोप करतील की, हे नक्कीच महाविकास आघाडीचे अपयश आहे. आणि  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणतील, गव्यास मारले ते पाकिस्तान-चीनच्या चिथावणीमुळेच, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

देशातील अॅलोपथी डॉक्टरांचं आज कामबंद आंदोलन

…तर मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत कर्फ्यू-पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल

’31 डिसेंबरपर्यंत तो फलक हटवला नाहीतर…’; तृप्ती देसाईंचा साई संस्थानला इशारा

तुम्ही UPA चं नेतृत्व करणार का?, शरद पवार म्हणतात…

गायिका कार्तिकी गायकवाडचं शुभमंगल सावधान; पाहा लग्नातील निवडक फोटो

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या