One Nation one Election l गेल्या कित्येक दिवसांपासून देशभरात चर्चा असलेल्या ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वन नेशन-वन इलेक्शन म्हणजे एक देश-एक निवडणुकीला मोदी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (18 सप्टेंबर) एक देश, एक निवडणूक या विषयावर सादर केलेल्या अहवालाला मंजुरी दिली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार :
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना मोदी सरकारचे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात वन नेशन-वन इलेक्शन या विषयावर विधेयक मांडले जाईल. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यात मंत्रिमंडळासमोर आपला अहवाल सादर केला होता.
मोदी 3.0 च्या 100 दिवसांच्या कार्यसूचीमध्ये वन नेशन-वन इलेक्शनचा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचाही समावेश आहे. कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालात देशभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासोबतच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या 100 दिवसांत नागरी निवडणुका घेण्याचे ही सूतोवाच करण्यात आले आहे.
One Nation one Election l सध्याच्या प्रश्नांवरून लक्ष वळवण्यासाठी हा निर्णय :
वारंवार होणाऱ्या निवडणुका देशाच्या प्रगतीत अडथळे आणत असल्याचे पीएम मोदी म्हणाले होते. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’साठी देशाला पुढे यावे लागेल. विशेष म्हणजे भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात वन नेशन-वन इलेक्शन या मुद्द्याला स्थान दिले आहे. भाजपसोबतच एनडीएमधील अनेक घटक पक्षही त्याला पाठिंबा देत आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी वन नेशन-वन इलेक्शनवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, हे व्यावहारिक नाही आणि ते चालणार नाही. सध्याच्या प्रश्नांवरून लक्ष वळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
News Title : What Is One Nation one Election
महत्वाच्या बातम्या-
‘या’ दिवशी थिएटरमध्ये 99 रुपयात पाहता येणार सिनेमा; असं बुक करा तिकीट
निधी मिळत नसल्याने शिंदे गटातील नेत्यानी विष घेत उचललं टोकाचं पाऊल, पुढे काय घडलं
रश्मी ठाकरे होणार राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?, चर्चेला उधाण
लग्न असो किंवा आजारपण PF खात्यातून काढता येणार ‘इतकी’ रक्कम; केंद्राचा मोठा निर्णय
T20 वर्ल्डकप स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम जाहीर, विजेत्या संघावर पडणार पैशाचा पाऊस