पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर खरंच पाडणार का?, वाचा काय आहे सत्य…

पुणे | शहरातील प्रसिद्ध असलेले व शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात बहुमानाचे स्थान असलेले बालगंधर्व रंगमंदिर पाडले जाणार अशी चर्चा होती. मात्र आता ही चर्चा खरी ठरलेली आहे. 

नाटककार, कलाकार, रंगकर्मी आणि प्रेक्षकांच्या कलेला वाव मिळावा म्हणून हे रंगमंदिर उभारण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनीच ही सुंदर वास्तु साकारली होती.

त्या जागेवर सहजरित्या सर्व गोष्टी उपलब्ध होतील, असे टोलेजंग बहु्मजली रंगमंदिर उभारण्याच्या दृष्टिने महानगरपालिकेकडून आवश्यक अशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता याठिकाणी नवी वास्तू उभी राहणार हे स्पष्ट झालं आहे. 

पुणे महापालिकेनं यासाठी निविदा मागवल्या आहेत. तसेच अंदाजपत्रकात 10 कोटी रुपयांची तरतूद देखील केली आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-जगाला हेवा वाटावा असा विक्रम पाकिस्तानी गोलंदाजाच्या नावावर!

-‘वसुंधरा राजे खूप जाड झाल्या आहेत, त्यांना आराम द्या’ वक्तव्यावर शरद यादवांच स्पष्टीकरण

-मलाही लग्न करुन सुखी संसार थाटायचा होता, पण… – कतरिना कैफ

-भाजपला मोठा झटका; मोदी सरकारमधील हा मंत्री काँग्रेससोबत जाणार???

-शेतकरी आक्रोश करत आहे, हे राज्य कारभारास लांच्छन- उद्धव ठाकरे