बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्याचा आणि समीर दाऊद वानखेडेंचा काय संबंध?’; मलिकांनी शेअर केला नवा फोटो

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नबाव मलिकांचं गौप्यस्फोटाचं सत्र आतादेखील सुरू असल्याचं दिसून येतंय. अशातच आता नवाब मलिक यांनी शेअर केलेल्या नव्या ट्विटमुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये एक व्यक्ती जीममध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. त्यावर ही व्यक्ती कोण आहे?, असा सवाल मलिकांनी शेअर केला आहे. त्याचा दाऊद वानखेडे आणि समीर दाऊद वानखेडे यांच्याशी काय संबंध?, असा सवाल देखील नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

नवाब मलिक सध्या गोंदिया दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पुन्हा समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. इतके का घाबरता आहात? आता नाव घ्यायला मी सुरुवात केलेली आहे, असा टोला मलिकांनी लगावला आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांचे मुले असतील, भाऊ असतील मुली असतील, कितीही शोधा आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर अजिबात घाबरत नाही, असं रोखठोक भाष्य देखील मलिकांनी यावेळी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

तरूणाईला कमी वयातच का येतोय हार्टअटॅक? समजून घ्या ‘ही’ महत्त्वाची कारणं

भाजपच्या मैदानात राहुल गांधींची किक! गोव्यातील जनतेला दिलं ‘हे’ वचन

जारवो म्हणतो ‘मी पुन्हा येईल’; “भारताला माझी गरज…”

‘नवाब मलिकांना मी खिशात ठेवतो’; चंद्रकांत पाटलांचा मलिकांना टोला

“काॅंग्रेस सोडून देशाचं राजकारण होऊच शकत नाही, काॅंग्रेस देशाच्या केंद्रस्थानी असेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More