‘कशाला तोंड उघडायला लावताय’; संजय राऊतांचा संभाजीराजेंवर हल्लाबोल
कोल्हापूर | राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा संभाजीराजे छत्रपतींनी केली होती. यावरुन त्यांनी शिवसेनेवर अनेक गंभीर आरोप केलेले पहायला मिळाले. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे.
कशाला तोंड उघडायला लावताय म्हणत संजय राऊत यांनी संभाजीराजेंना इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या मालकीचे नाहीत. तर ते संपूर्ण देशाचे आणि विश्वाचे आहे. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीचा विषय आमच्यासाठी संपला, असंही राऊत म्हणाले.
संभाजीराजेंविषयी आमच्या मनात आदर आणि प्रेम आहे तो तसाच राहणार आहे, असंही राऊत यांनी म्हटलं. कोल्हापूरात सभा आणि बैठकांसाठी गेले असताना माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून, स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
Hanuman Chalisa | राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी येणार आमने-सामने
‘या’ तारखेपर्यंत मान्सून राज्यात धडकणार, हवामान खात्याचा अंदाज
विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
नवनीत राणांना अटक करणं भोवणार?; समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे अजित पवारांचा गंभीर इशारा, म्हणाले…
Comments are closed.