बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदेंच्या मंत्रिमंडळातून चंद्रकांत पाटलांचा पत्ता कट?, महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचं नवं मंत्रिमंडळ (Cabinet) कसं असणार आहे याची चर्चा सध्या सुरूये. कोणत्या नेत्याला कोणतं पद मिळणार? असा अंदाज लावला जात आहे. भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना कोणतं खातं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

भाजप (BJP) प्रदेशाध्याक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना मात्र मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आलं आहे. त्यांना पुन्हा पक्षविस्ताराची जबाबदारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मिळालेले उपमुख्यमंत्रीपद आणि आता चंद्रकांत पाटील यांना न मिळालेलं मंत्रीपद यावरून ही सगळी सूत्र पक्षश्रेष्ठीनुसार चालतात हे पुन्हा अधोरेखित झालं आहे.

चंद्रकांत पाटील हे भाजपच्या काळात मुख्यमंत्री राहीले आहेत. 2014 च्या युतीवेळी चंद्रकांतदादा पाटील याच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद व सहकारातील चार मंत्रीपदे होती. महसूल खात्याची जबाबदारीही त्यांच्याकडे होती.

चंद्रकांत पाटील हे भाजपचे जेष्ठ नेते आहेत. राज्यातील ध्येय धोरणामध्ये त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. पण पक्षश्रेष्ठी आदेशानुसार त्यांना पक्षविस्ताराकडे लक्ष द्यायचं आहे. सध्यातरी चद्रकांतदादा पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावर समाधान मानावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या

विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; ‘या’ आमदाराला संधी

छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ते पदी डॉ. धनंजय राजाराम जाधव यांची निवड

बंडखोर आमदार राहिलेल्या गुवाहाटीच्या हॉटेलचं एकूण बिल किती?; आकडा वाचून धक्का बसेल

ईडीच्या चौकशीची पिडा टळली; उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी समोर

“शासकीय पूजेनंतर महिन्याभरात शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More