Kunal Kamra Song l स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यावेळी त्याच्या कॉमेडी शोमधील एका गाण्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. मुंबईतील खार परिसरात आयोजित करण्यात आलेल्या शो दरम्यान कामराने सादर केलेल्या गाण्यातील काही ओळींवरून शिवसेना शिंदे गटाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.
गद्दार शब्दावरून वादाची ठिणगी :
कुणाल कामराने आपल्या कार्यक्रमात गायलं – “गद्दार नजर वो आए…” हे गाणं. या गाण्याच्या संदर्भात कामराने कोणाचंही थेट नाव घेतलं नसलं, तरी या ओळींमध्ये अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, “गद्दार” हा शब्द आणि त्यानंतर आलेल्या विडंबनात्मक ओळींमुळे शिवसैनिक संतप्त झाले. त्यांचा आरोप आहे की, या प्रकारामुळे त्यांच्या भावनांना ठेच पोहोचली असून, हे राज्याच्या राजकीय नेतृत्वाचा अपमान आहे. या पार्श्वभूमीवर, खार परिसरातील युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये तोडफोड करण्यात आली, जिथे कुणाल कामराचा शो पार पडला होता.
Maharashtra ❤️❤️❤️ pic.twitter.com/FYaL8tnT1R
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 23, 2025
Kunal Kamra Song l कुणाल कामराने गायलेलं गाणं जशाच तस :
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा… हाये…
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा… हाये…
एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छिप जाये…
मेरी नज़र से तुम देखो, गद्दार नज़र वो आए…
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा… हाये…
मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाये…?
जिस थाली में खाए, उसमें ही वो छेद कर जाए…
मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए…
तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे…
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा… हाये…