बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलांना कोरोनाची लागण झाली तर काय कराल?; केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली ‘ही’ महत्वाची माहिती

नवी दिल्ली | कोरोनाने सध्या देशभरात थैमान घातलं आहे. कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. याचा पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

घशात खवखव, घसा दुखणे अशी लक्षणं असतील पण शासोच्छवासाला कोणताही त्रास होत नसेल. म्हणजेच माईल्ड इन्फेक्शन असेल तर लहान मुलांना होम आयसोलेशनमध्ये ठेवा. त्यासोबतच जास्तीत जास्त तरल पदार्थ द्या. त्यामुळे शरीर हायड्रेट रहायला मदत होईल. हलका ताप येत असेल तर, 10 ते 15 एमजी पॅरासिटामॉल द्यावी. मात्र काही गंभीर लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

काही लहान मुलांच्या बाबतीत कोरोना संक्रमणानंतरही कोणतीच लक्षण दिसत नाहीत. अशा मुलांवर उपचारासंबंधी काही सांगण्यात नाही आलं आहे. पण त्यांच्या लक्षणांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर गंभीर इन्फेक्शन असेल तर मुलांमध्ये न्युमोनिया, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, मल्टी ऑर्गन डिसइन्फेक्शन सिंड्रोम आणि सेप्टिक शॉक अशी गंभीर लक्षणे असतील तर अशा मुलांना तात्काळ आयसीयूत किंवा एचडीयूमध्ये दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, ताप आल्यास पॅरासिटामोल आणि बॅक्टेरियल इनफेक्शन असल्यास अमोक्सिसिलिनसाठी दिलं जाऊ शकतं. शरीरात ऑक्सिजन 94% पेक्षा कमी असेल तर मुलाला ऑक्सिजन द्यावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

ऑक्सिजन, लस, रेमडेसिवीर केंद्राने द्यावं, मग तुम्ही काय झोपा काढताय?- चंद्रकांत पाटील

पुण्यात फार्महाऊसवर नाचगाणं, पैशांचा पाऊस अन् पोरी, पोलिसांची रेड पडदाच गदारोळ

एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही- नाना पटोले

“…तर भर चौकात गिरीश महाजनांचा सत्कार करेल”; गुलाबराव पाटलांचं महाजनांना आव्हान

विनाकारण घराबाहेर फिरत होत्या मुली, पोलिसांनी अशी घडवली अद्दल, पाहा व्हिडीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More