बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदींसोबत झालेल्या भेटीत काय चर्चा झाली?, शरद पवार म्हणतात…

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता या भेटीवर खुलासा केला आहे. शरद पवार यांनी ट्विट करून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

पंतप्रधानांशी माझी भेट झाली. या भेटीत राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, असं पवारांनी स्पष्ट केलं. पवारांनी या ट्विटसोबत पंतप्रधानांना देण्यात आलेलं एक पत्रंही पोस्ट केलं आहे.

बँकिंग रेग्युलेटरी अॅक्टमध्ये बदल करण्यात आला असून तो सहकारी बँकांसाठी धोकादायक आहे. याबाबत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चाही केली होती. मात्र या विषयावर भेटून चर्चा करू असे नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयावर अधिक चर्चा झाली, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

दरम्यान, ईडीने राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं होतं. त्याआधी पवार आणि केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची भेट झाली होती.  यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

थोडक्यात बातम्या- 

पुढील 24 तासात ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

‘कोरोनामुक्त झालेल्यांना टीबीचा धोका’; आरोग्य मंत्रालयानं दिली महत्वाची माहिती

‘सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या…’; चित्रा वाघ यांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

डॉक्टरांनी जिवंत बाळाला केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारावेळी जे घडलं त्याने सर्वांनाच बसला धक्का

मुंबईत पावसाचा हाहाकार; विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More