“संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय होती?”, शरद पवारांचा रोखठोक सवाल
नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. संजय राऊतांवर कारवाई केल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या भेटीनंतर शरद पवारांनी काही सवाल केले आहेत.
संजय राऊत हे राज्यसभेचे सदस्य आहेत, त्यांच्यावर कारवाई करणं चुकीचं आहे. केंद्रीय यंत्रणांची कारवाई अन्यायकारक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं, असं शरद पवार म्हणाले. संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय होती?, असा सवालही त्यांनी केलाय. संजय राऊतांचा मुद्दा पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिला आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर जे विषय मांडले आहेत त्यावर पंतप्रधान योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील 12 आमदारांच्या नियुक्तीचा विषयासंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा झालेली आहे, असं शरद पवार म्हणाले. राज्यपालांनी 12 आमदारांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का?, अशीही चर्चा होती. त्यावर शरद पवारांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या प्रकारे सुरू आहे. आमचे भाजपसोबत कोणतेही संबंध नव्हते आणि यापुढेही असणार नाहीत. राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
थोडक्यात बातम्या-
पवार-मोदी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?, पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले…
“भाजपची कटुता ही राष्ट्रवादीशी नाही तर शिवसेनेशी”; भाजपच्या नेत्याचं सूचक वक्तव्य
Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात इतक्या रुपयांची घसरण
BREAKING | शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट, चर्चांना उधान
मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख CBI च्या ताब्यात
Comments are closed.