बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘काय नाव होतं त्यांचं, काय ते’; बिपीन रावतांना श्रद्धांजली देतानाचा सदावर्तेंचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ल्ली |  देशाच्या महत्त्वाच्या पदावर काम करणारे बिपीन रावत हे आपल्या कामानिमीत्त प्रवास करत होते. तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात (Helicopter Accident) अखेर सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानं देशात एकच खळबळ माजली आहे.

बिपीन रावत यांच्यासह पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यादेखील हेलिकॉप्टरमध्ये होत्या. त्याचं देखील निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. अशातच बिपिन रावत यांना श्रद्धांजली अर्पण करतानाचा प्रसिद्ध वकिल गुणरत्न सदावर्ते यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये ते काय नाव होतं त्यांचं, काय होतं ते, असं बिपिन रावत यांच्याबद्दल विचारताना दिसत आहेत. गुणरत्न सदावर्ते यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला.

दरम्यान, या व्हायरल होणऱ्या व्हिडीओवरुन गुणरत्न सदावर्तेना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे.सदावर्ते तुम्हाला लष्कर प्रमुखाचं नाव माहित नाही, पद माहिती नाही श्रद्धांजली व्हायला लागले…, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी सदावर्तेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

संजय राऊतांनी घेतली प्रियंका गांधींची भेट; तासभर चर्चेनंतर राऊत म्हणाले…

दिलासादायक! पहिला Omicron बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाला

“आमचं हेलिकाॅप्टर असंच ढगामध्ये सापडलं होतं…”; शरद पवारांनी सांगितला किस्सा

अपघात की घातपात? निवृत्त ब्रिगेडर हेमंत महाजन म्हणतात, “चीनने हा…”

राज्याचं टेन्शन वाढलं! Omicron रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More