मुंबई | औरंगाबादच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केल्यानं काय साध्य होणार? असा सवाल अमोल कोल्हे यांनी केलाय.
मुंबई पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, औरंगाबाद या शहराचा उल्लेख संभाजीनगरच व्हायला हवा. पण त्याचप्रमाणे राज्यकर्ता म्हणून सर्वांगिण विकास व्हायला हवा.”
ते पुढे म्हणाले, “आपली अस्मिता आणि प्रतिकेच्या मागे किती धावायचं, नाव बदलण्याने काय साध्य होणार आहे? अस्मितेच्या प्रश्नांनी मराठवाड्याचे प्रश्न थांबणार नाहीत. तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीयेत.”
मराठा आरक्षणासंदर्भात बोलत असताना ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट असून सरकार सातत्याने भूमिका मांडतंय. एबीसी आरक्षणाबाबात संसदेत जनगणनेत वेगळा रकाना असायला हवा. जोवर संख्या समजणार नाही तोवर काही ठरवता येणार नाही.”
महत्वाच्या बातम्या-
“भाजप दिवाळी साजरी करत नाही, तर जनतेला दिवाळखोरीत काढतं”
भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं!
“बिहार निवडणुकांतील यश आणि विजय देवेंद्र फडणवीसांमुळे”
माजी मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरात चर्चेचा विषय झालेल्या इमरती देवी आघाडीवऱ
“पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार हेच बिहारच्या पराभवाचे वाटेकरी”