बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमाप रिटर्न्स देणाऱ्या क्रिप्टोकरन्सीचं काय होणार?, केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

नवी दिल्ली | सध्या भारतात क्रिप्टोकरन्सी मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. क्रिप्टोकरन्सीने (Cryptocurrency) अनेकांना काही तासातच लाखोंच्या पटीने परतावा दिला आहे. मागील काही दिवसांमध्ये बाजारात आलेल्या क्रिप्टोकरन्सीमुळे अनेक गुंतवणुकदार मालामाल देखील झाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता केंद्र सरकार यावर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. (The Cryptocurrency and Regulation of Official Digital Currency Bill 2021)

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत एक विधेयक (bill on cryptocurrency) आणणार आहे. ‘द क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल 2021’ असं या विधेयकाला नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

देश स्वतःच्या डिजिटल चलनाची वाट पाहत आहे. खासगी क्रिप्टोकरन्सीवर कोणतेही नियंत्रण नाही. त्यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. या प्रकरणात त्यांच्यावर बंदी घातली जाऊ शकते, असं अर्थमंत्री निर्मला सितारमण काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या.

दरम्यान, येत्या काळात खासगी क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार ठोस पाऊलं उचलताना दिसू शकणार आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार का की अडचणीत वाढ होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

वीजतोडणीचा प्रश्न पेटला, शेतकऱ्यांसाठी आमदाराचा गळफास घेण्याचा प्रयत्न

तुमचं मतदार यादीत नाव नाही?; मग आता करा थेट मोबाईलवरून नोंदणी

परमबीर सिंहाच्या घरापुढे पोहोचली टीम, दारावर चिकटवली ‘ही’ नोटीस

खुद्द शरद पवार साताऱ्यात दाखल! शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर बंद दाराआड खलबतं

‘प्रस्ताव आला तर भाजप विचार करेल’; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More