Top News महाराष्ट्र मुंबई

“पर्यावरणावर नुसती भाषणं देऊन काय होणार?, त्यासाठी धाडसाने निर्णय घ्यावे लागतात”

मुंबई | पर्यावरणावर नुसती भाषणे देऊन काय होणार? धाडसाने निर्णय घ्यावे लागतात, असा टोला शिवसेनेनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

खून, बलात्कार करणाऱ्यांचे समर्थन राजकीय स्वार्थासाठी सरळ केले जाते, पण ‘झाडे वाचवा, जंगले वाचवा’ असे सांगणाऱ्यांना गुन्हेगार ठरवून त्यांचा छळ केला जातो. ‘आरे’च्या जंगलामधील दोन हजारांवर झाडांची एका रात्रीत सामुदायिक कत्तल केली गेली. झाडांनाही जीव आहे हे मान्य केले तर ते आरेच्या जंगलातील सामुदायिक हत्याकांडच मानावे लागेल, असं शिवसेनेनं म्हटलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय घेऊन त्या मृत झाडांना विनम्र श्रद्धांजलीच अर्पण केली, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधलाय.

महत्वाच्या बातम्या-

लोकं आमच्या कुटुंबाकडे कुत्सित नजरेने बघायचे- नवाजुद्दीन सिद्दीकी

…अन् भर मैदानात पांड्या बंधू एकमेकांवर संतापले

‘तुमच्या मुलीबरोबर असं झालं असतं आणि…’; न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलं

…म्हणून मुंबई, ठाण्यातील भागांत रात्रीपर्यंत वीज नव्हती- नितीन राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या