बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिन्याभरात कोरोना काय रुप घेईल?; नितीन गडकरींचा जनतेला मोठा इशारा

नागपूर | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या राष्ट्रीय कॅन्सर केंद्रामध्ये 100 खाटा असलेल्या कोविड रुग्णालयाचे नुकतेच उद्घाटन केले. यावेळी त्यांनी कोरोनाबद्दल वक्तव्य करून जनतेला मोठा इशारा दिला आहे. यादरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कोरोना येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आणखी किती प्रमाणात वाढणार याची काही शाश्वती नाही. तसेच हा आणखी किती गंभीर बनत जाणार आणि कधीपर्यंत चालणार याचंही काही सांगता येत नाही. सध्या घरातील एकाला तरी कोरोनाची लागण होत आहे, असं यावेळी म्हटलं आहे.

आज कोरोना सेंटरचं उद्घाटन करत असताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कोरोनाबद्दल केलेल्या या वक्तव्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. तसेच ही परिस्थिती आणखी किती दिवस राहणार हे कोणालाच माहीत नसल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.

“आपण सर्वांनी सर्वात चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, पण सर्वात खराब परिस्थिती जर आली तर त्यासाठी तयारही राहिलं पाहिजे.” असं वक्तव्य या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी जनतेला उद्देशुन केलं आहे तसेच येत्या पंधरा दिवसात कोरोनाची परिस्थिती आणखी किती गंभीर बनत जाते, हे सांगणं अवघड असल्याचंही त्यांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“सरकारने शालूच्या फोटोंवरील कमेंट्सवर लाॅकडाऊन लावावा”

महाराष्ट्रातील निर्बंध आणखी कडक होणार; सर्वसामान्यांना पेट्रोल मिळणार नाही?

दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू! मंदिरातून येताना दोन मुलींसोबत झालं मन हेलावून टाकणारं कृत्य

मुलीवर झालेल्या लैगिंक अत्याचारामुळे संतापलेल्या बापाने थेट आरोपीचं घर गाठलं अन्…

मंदिरातील मूर्त्या तोडणाऱ्याला पोलिसांनी पकडलं, त्याने सांगितलेलं कारण ऐकुन पोलिसही चक्रावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More