बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी सरकारने देश उध्वस्त करायचं ठरवलं असेल तर काय करणार?”

मुंबई | मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा दोन दिवसांपूर्वी पार पडला आहे. यामध्ये अनेक नवीन नेत्यांना संधी देण्यात आली.  केंद्र सरकारने नवीन सहकार मंत्रालयाची निर्मिती केली असून त्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यावरून राज्यातील विरोधी पक्षनेते केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत.

अशातच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही याच मुद्यावरून नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. केंद्रातील मोदी सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. मात्र त्यांना सहकाराची एबीसीडी माहिती नाही. कदाचित सहकार क्षेत्राची व्यवस्था उध्वस्त करायची म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असं पटोले यांनी म्हटलं आहे. आज नाना पटोले यांनी पुणे दौरा केला. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

तसेच नरेंद्र मोदी आधीपासूनच देशातील अनेक व्यवस्था उध्वस्त करत आहेतच. त्यामुळे मोदी सरकारनेच जर देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार?, असा खोचक सवालही नाना पटोले यांनी केला आहे.

त्याचबरोबर काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद मिळाले नाही यावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारकडून आयोजित करण्यात आलेलं पावसाळी अधिवेशन दोनच दिवसांचं होतं. मात्र, आमच्या महाविकास आघाडी सरकारचे इंजिनपण आणि ड्रायव्हरपण चांगलं असल्याचं पटोले यांनी यावेळी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“मी एवढी मोठी नाही की, मला संपवण्यासाठी अगदी पंतप्रधानापासून कामाला लागतील”

“टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, मी-मी असं चालत नाही”

“मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्व भाजप नेत्यांना देवेंद्र फडणवीसांनी संपवलं”

…म्हणून मी नव्या मंत्र्यांचं अभिनंदन केलं नाही- पंकजा मुंडे

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज का?; पंकजा मुंडे म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More