एका दिवसाचं मुख्यमंत्रीपद मिळालं तर काय कराल?, राज ठाकरे म्हणाले…

मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुलाखत घेतली.

या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना एक दिवसांचं मुख्यमंत्रीपद मिळालं तर काय कराल, कोणती गोष्टी आधी कराल? असा प्रश्न विचारला. 

आमच्या शुभेच्छा आहेत की आपण नक्की मुख्यमंत्री बनावेत आणि पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करावा. पण परिस्थिती अशी आली की तुम्हाला मुख्यमंत्री बनावं लागलं पण ते फक्त एक दिवसाचं, त्या एक दिवसात तुम्ही काय कराल? तुम्ही एकदा म्हणाला होता की, एकदा सत्ता हातात द्या, सुतासारखं सगळ्यांना करेन. काय कराल?, असं अमृता फडणवीस म्हणाल्यात.

एका दिवसात काय होतं? तुम्ही पाच वर्षाचं मुख्यमंत्रीपद देत होता, आता एका दिवसावर कुठे आलात?, असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं.

महत्वाच्या बातम्या-