Top News

9 आॅगस्टला काय कराल? मराठा क्रांती मोर्चाकडून निवेदन जारी!

मुंबई | 9 आॅगस्टला मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. त्या दिवशी नेमकं काय करायचं? या बद्दलचं निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जारी करण्यात आलं आहे.

नेमकं काय म्हटलंय निवेदनात-

9 आॅगस्टला सकाळी 9 वाजल्यापासून  ते सांयकाळी 5 पर्यत मराठा बांधवानी आपल्या गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यावर किंवा मुख्य ठिकाणी महिला, मुले, आबाल-वृद्ध, गुरेढोरे, बैलगाड्या, ट्रॅक्टर, टेम्पो सह हजारोच्या संख्येने ठाण मांडतील. तसंच कुठल्याही अनुचित प्रकारास प्रोत्साहन देणार नाही. सरकारी यंत्रणेनं पोलिस बळाचा वापर करत वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केल्यास त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकार जबाबदार राहील.

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या